Skip to content Skip to footer

निगडी आगारात फक्‍त 6 चार्जिंग पॉईंट :बस वाढल्यास आणखी अडचणी वाढणार

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक गतिमान व सुरक्षित करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) काही सकारात्मक पावले टाकले जात आहेत. यामुळेच पीएमपीच्या ताफ्यात ई-बसेस व सीएनजी बस दाखल झाल्या आहेत. मात्र, अपुऱ्या चार्जिंग स्टेशनमुळे ‘ई-बस’ला चार्जिंग करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

निगडी येथील पीएमपीच्या आगारात 25 ‘ई-बस’ असून त्यासाठी मात्र, सहाच चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत. त्यातही लाईट गेल्यावर चार्जिंग स्टेशन बंद होतात. परिणामी ‘ई-बस’ला चार्जिंग अभावी मार्गावर जाण्यास उशीर होत आहे. तर, काही फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत.निगडी आगाराला पीएमपी प्रशासनाने आधी 9 फुटी 10 बसेस व नंतर 15 बीआरटी मार्गात धावणाऱ्या 12 फुटी बसेस दिल्या आहेत. निगडी आगारात एकूण 25 ई-बसेस आहेत. मात्र, त्यांना चार्जिंग करण्यासाठी फक्‍तसहाच चार्जिंग स्टेशन आहेत. त्यामुळे गाड्यांची चार्जिंग पूर्ण होत नसल्याने गाड्यांना मार्गावर जाण्यासाठी उशीर होत आहे.

एका बसला चार्जिंग करण्यासाठी साधारण तीन तास लागतात. एकदा शंभर टक्के चार्जिंग झाल्यावर 9 फुटी ई-बस 220 तर, 15 फुटी बस 240 किलोमीटर हायवे मार्गावर धावते. तर, शहराच्या अंतर्गत भागात मात्र एवढे मायलेज मिळत नाही. निगडी आगारातून या गाड्या लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडण्यात आल्या असल्याने चार्जिंग पूर्ण होणे गरजेचे असते. अपुऱ्या चार्जिंगमुळे अडचणी येत आहेत. गुरुवारी शहरातील लाईट काही काळ बंद असते. त्यामुळे या गाड्यांना चार्जिंगसाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

Leave a comment

0.0/5