व्यापाऱ्याला व्हॉट्सअ‌ॅप स्टेटस ठेवणं पडलं चक्क चार कोटींना!

व्हॉट्सअ‌ॅप स्टेटस | The merchant had to keep WhatsApp status for four crore!

दैनंदिन आयुष्यात आपण जिथे जाऊ तिथलं व्हॉट्सअ‌ॅपच स्टेटस ठेवतो. यातून काय आनंद मिळतो माहित नाही. पण तरी आपण ठेवतो. मात्र पुण्यातील एका व्यापाऱ्याला हे स्टेटस ठेवल्यामुळे चार कोटींचा फटका बसला आहे. अप्पा श्रीराम कदम, असं व्यापाऱ्याचं नाव आहे. व्यापाऱ्याने पुणे ग्रामीण पोलिसांत याबाबत तक्रार दिली होती.

दौंड रेल्वे स्थानकाच्या तिकीट घरासमोर दोन जणांना चाकूचा धाक दाखवून बळजबरीने अप्पा कदम यांंना गाडीत बसवून त्यांच्याकडून सोन्याचे बिस्कीट आणि रोख रक्कम लंपास केली होती.

चोरी करणाऱ्या चार जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 3 कोटी 70 लाख 71 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.व्यापारी जिथे जाईल तिथे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस अपडेट ठेवत होता. चोरट्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. ज्या गावात व्यापारी सोने खरेदीला गेल्याची माहिती देखील त्यांच्या स्टेटसवरूनच चोरट्यांना समजली. दौंड रेल्वे स्थानकाबाहेर चोरांनी पाळत ठेवून व्यापाऱ्याला चार कोटींना लुबाडलं. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here