सोसायटीमध्येच भाजीपाला विक्री – नगरसेवक अमोल बालवडकर यांची नाविन्यपूर्ण संकल्पना.

सोसायटीमध्येच-भाजीपाला-विक्री-Within the Society - Vegetable sales

सोसायटीमध्येच भाजीपाला विक्री – नगरसेवक अमोल बालवडकर यांची नाविन्यपूर्ण संकल्पना.

राज्यात व देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला व संसर्गाला टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे लोक डाउन घोषित केले होते. ज्यामध्ये २१ दिवस आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे तसेच विनाकारण घराबाहेर येऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार संपूर्ण देशभरात लॉक डाउनचे काटेकोरपणे पालन होताना दिसून येत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वप्रथम पुणे शहर व जिल्ह्यात आढळून आला होता. त्यामुळे पुणे येथे वास्तव्यास असलेले अस्थानिक लोकांनी शहर सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु स्थानिक पुणेकरांना मात्र याची चिंता अधिक भासत आहे. या भयावह वातावरणात जीवनावश्यक वस्तू जसे की, भाज्या, फळं, दूध व किराणाचे सामान मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहता गर्दी करणे हे देखील संसर्गाचे प्रमुख कारण ठरू शकते.

 

सोसायटीमध्येच-भाजीपाला-विक्री-Within the Society - Vegetable sales

त्यामुळे पुण्यातील बाणेर-बालेवाडी येथे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी एक नाविन्यपूर्ण संकल्पना राबवली आहे. ज्यामध्ये राहत्या सोसायटीमध्येच नागरिकांना ठराविक अंतरावर उभे करून भाजी विकत घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कुठलीही गर्दी न करता व सार्वजनिक अंतराचे (Social distancing) नियम न मोडता ही सुविधा मिळत असल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे .

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here