Skip to content Skip to footer

पु्ण्यात कोरोनाचा कहर: दिवसभरात 3 रुग्णांचा मृत्यू तर 27 नवे रुग्ण

पुणे शहरात आज दिवसभरात कोरोना विषाणूने 3 रुग्णांचा बळी घेतला आहे. त्याचबरोबर 27 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. पुणे शहरातील मृतांची एकूण संख्या 29 वर पोहोचली आहे. त्यात 21 मृत एकट्या ससून रुग्णालयातील असून बारामतीतील एकाचा समावेश आहे. दरम्यान पुणे शहरासह जिल्ह्यात एकूण 262 तर पिंपरी चिंचवडमध्ये 26 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आहेत.

मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

दरम्यान महाराष्ट्रात मुंबईत सर्वाधिक रुग्ण असून आज 189 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. या अकरापैकी तिघांचा मृत्यू गेल्या चार दिवसांत झाला असल्याची माहिती आहे. मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1182 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे 75 जणांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी दोन रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये आणि संशयितांमध्ये वाढ होत आहे. आज दिवसभरात 293 संशयित रुग्ण दाखल करण्यात आलं आहे.

लॉकडाऊनचे नियम पाळा, नाहीतर… राजेश टोपे यांचा इशारा

कोरोनाचा महाराष्ट्रात प्रकोप वाढत आहे. लॉकडाऊनही वाढविण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले देशातच कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन देशात ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

मुंबई, ठाणे, पुणे कोरोनाच्या रेड झोनमध्येच असतील. तिथे लॉकडाऊनचं कठोरपणे पालन करावं लागेल. हे पालन योग्य पद्धतीने झालं नाही तर लॉकडाऊन आणखी वाढवावा लागेल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. मेट्रो सिटींमध्ये त्याचं योग्य प्रकारे पालन होत नाही असंही ते म्हणाले.महाराष्ट्रात तीन प्रकारचे रुग्णालये असणार आहेत. सोम्य, मध्यम आणि तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना त्या त्या प्रमाणात तिथे दाखल केलं जाणार आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे हे रेड झोनमध्ये राहणार आहे. कारण एकूण रुग्णांमध्ये 91 टक्के हे याच भागात आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीत. महाराष्ट्रात पूल टेस्टिंग होणार असल्याचंही त्यांना सांगितलं.

Leave a comment

0.0/5