Skip to content Skip to footer

लवकरच होणार कोविड -19 चा नायनाट, पुण्यात कोरोनाच्या लसीचे होणार उत्पादन

लवकरच होणार कोविड -19 चा नायनाट, पुण्यात कोरोनाच्या लसीचे होणार उत्पादन

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. चीन पाठोपाठ इतरही देशात कोरोनाचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी लसीवर काम चालू झाले आहे. त्यातच पुण्याच्या सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि जगातील नामांकित ७ कंपन्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत कोरोनाची लस तयार करण्यासाठी पार्टनरशीप मध्ये करार केला आहे. लस बनवणारी कंपनी सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दिलासादायक बातमी दिली आहे.

कोरोनाला हरवण्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या कोविड-१९ लसीचं उत्पादन दोन ते तीन आठवड्यात सुरू करायची योजना असल्याचं सेरम इन्स्टिट्यूटने सांगितलं आहे. या लसीचं मानवी परीक्षण यशस्वी राहिलं, तर ऑक्टोबर महिन्यात लस बाजारात येऊ शकते, असा दावाही कंपनीने केला आहे.

दरम्यान, सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला म्हणाले, ‘कोविड-१९ची लस सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बाजारात येईलअशी आमची अपेक्षा आहे, फक्त लसीचं परीक्षण यशस्वी आणि सुरक्षित झालं पाहिजे. आम्ही पुढच्या २ ते ३ आठवड्यात या लसीचं टेस्टिंग भारतात सुरू करणार आहोत.

Leave a comment

0.0/5