पुणे विभागात एकाच दिवसात आढळले 200 करोनाबाधित

पुणे विभागात एकाच दिवसात -In a single day in Pune division

पुणे विभागात करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कालपर्यंत 1702 संख्या होती. आज त्यामध्ये तब्बल 200 रुग्णांनी वाढ झाली आहे. आता पुणे विभागाची संख्या 1 हजार 905 इतकी झाली आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. तर त्याच दरम्यान आज अखेर 305 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर म्हणाले की, पुणे जिल्हयात 1 हजार 738 बाधीत रुग्ण आढळले असून 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सातारा जिल्हयात 43 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर सोलापूर जिल्हयात 81 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 30 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर कोल्हापूर जिल्हयात 13 बाधीत रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

देशभरात १८२३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. आता देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या ३३ हजार ६१० झाली आहे. यापैकी ८ हजार २७३ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन १ हजार ७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here