Skip to content Skip to footer

युवासेना पदाधिकारी सूरज लांडगे यांच्या आवाहनाला जनतेचा प्रतिसाद.

युवासेना पदाधिकारी सूरज लांडगे यांच्या आवाहनाला जनतेचा प्रतिसाद.

सध्या संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या कोरोनाच्या थैमानामुळे जनतेमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोना बधितांची संख्या देखील वाढत आहे. परंतु अनेक प्रयत्नांनी कोरोना बाधितांना उपचार व प्लाझ्मा दानाने दिलासा देण्यात राज्य सरकार यशस्वी ठरत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना मुक्त झालेल्या नागरिकांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन देखील केले आहे. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख यांनी केलेल्या या आवाहनाला नागरिकांपर्यंत पोहचविण्यात शिवसैनिक व युवासेना कार्यकर्ते देखील पुढाकार घेत आहेत.

असाच एक प्रसंग पुणे येथे घडला आहे. युवासेनेचे पदाधिकारी सूरज लांडगे यांनी कोरोना काळात असंख्य नागरिकांना मदत करणे तसेच कोरोना मुक्त नागरिकांना प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या आवाहनाला पुण्यातील भंडारे परिवाराने सकारात्मक प्रतिसाद देऊन प्लाझ्मा दान केले आहे.

इतर कोरोना बाधितांना कोरोनाच्या संकटात मदत व्हावी यासाठी लांडगे यांनी स्वतःहून भंडारे परिवाराला संपर्क साधला. या परिवरातील संतोष सुभाष भंडारे आणि विनोद सुभाष भंडारे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्वरित YCM हॉस्पिटलमध्ये येऊन प्लाझ्मा दान केले.

सूरज लांडगे व भंडारे कुटुंबाने समाजापुढे आदर्श घडवला असून, सामाजिक भान जपून कार्य केल्यास कोणत्याही संकटावर मत केली जाऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले.

Leave a comment

0.0/5