कोरोना परिस्थिती सुधारल्यावर महाविद्यालय सुरु होणार – मंत्री उदय सामंत
कोरोनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ऑनलाइन माध्यमांच्या साह्याने शिकवला जाणारा अभ्यासक्रम ग्राह्य धरला जाणार असून त्याद्वारेच परीक्षा घेतली जातील. मात्र कोरोना परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतरच महाविद्यालय सुरु करण्यात येतील असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षेचा आढावा घेतल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री उदय सामंत बोलत होते. पुढे बोलताना सामंत म्हणाले की पुणे विद्यापीठातर्फे २ लाख विद्यार्थीं ऑनलाइन तर ५० हजार विध्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार आहेत. विद्यपीठाने आवश्यक ती सर्व तयारी केलेली आहे.
पुणे, नगर आणि नाशिक जिल्हयात परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात म्हणून जिल्हा प्रशासन व विद्यापीठ यांच्यातील समन्वयासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विद्यापीठात घेण्यात आलेल्या बैठकीत तिन्ही जिल्हयातील प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.