Skip to content Skip to footer

ज्येष्ठ नागरिकाला डेटिंगचा मोह पडला महागात; साडे तीन लाखांची फसवणूक

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोहोचला पोलीस ठाण्यात

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अनोळखी व्यक्ती आपल्या संपर्कात येत असतात. मात्र, योग्य खबरदारी घेतली नाही तर हा संपर्क अनेकदा महागात देखील पडतो. यातून आर्थिक फसवणुकीच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अशीच एक घटना पुणे शहरात घडली असून एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल तीन लाखांची फसवणूक झाली आहे. या याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे शहरातील क्वार्टर गेट परिसरात एक ६७ वर्षीय जेष्ठ नागरिक राहण्यास आहे. या व्यक्तीला एकाने मोबाईलवर संपर्क साधला, आणि डेटिंगची ऑफर दिली. डेटिंगसाठी तुम्हाला मुली पुरवितो असे सांगून फोनवरील व्यक्तीने वेळोवेळी या ज्येष्ठ नागरिकाकडून एका खात्यावर तब्बल ३ लाख ७४ हजार रुपये जमा केले.

मात्र, कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच. या ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांत तक्रार दिली असून गुन्हाही दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

Leave a comment

0.0/5