ठेकेदारांकडून पैशांची मागणी

ठेकेदारांकडून-पैशांची-मा-From contractors-money-ma

पाणीमीटरची जोडणी, जलवाहिनीसाठी पैशांची मागणी होत असल्याची नागरिकांची तक्रार

महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घरोघरी पाणी मीटरची जोडणी आणि मुख्य जलवाहिनीपासून वाहिनी टाकण्याची कामे करण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या खासगी ठेकेदारांकडून नागरिकांकडे पैशांची मागणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तशा तक्रारीही महापालिका प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या कामात गैरप्रकार होत असल्याचेही स्पष्ट झाले असून पैशांची मागणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.

शहराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने सर्व भागाला समन्यायी पद्धतीने पाणी मिळावे यासाठी समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. याअंतर्गत नव्याने जलवाहिनी टाकणे, घरोघरी पाणी मीटर बसविणे, साठवणूक टाक्यांची उभारणी करणे अशी कामे महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहेत. नळजोड बसविणे तसेच एएमआर पाणी मीटर बसविण्यासाठी महापालिके ने कं पनीची नियुक्ती के ली आहे. त्यासाठी या कं पनीला महापालिके कडून रक्कमही देण्यात आली आहे. मात्र नळजोड आणि मीटर बसविण्यासाठी ठेके दारांकडील कर्मचारी नागरिकांकडे पैसे मागत असल्याचे पुढे आले आहे. तशा काही तक्रारी आल्याची स्पष्ट कबुली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कामे सुरू असताना नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांकडेही त्याबाबत तक्रार के ली होती. मात्र आता महापालिके च्या पाणीपुरवठा विभागाकडेच थेट तक्रारी आल्यामुळे या कामांमध्ये गैरव्यवहार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, पाणी मीटर बसविण्यासाठी कं पनीला काम देण्यात आले आहे. त्या कं पनीकडून उपकं पनीला काम दिले असल्याची आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी होत असल्याची शक्यता आहे, असा दावा पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी के ला. नागरिकांकडून प्रत्यक्ष किं वा अप्रत्यक्षरीत्या पैशांची मागणी करण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले.

विविध कामांचे नियोजन

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १ हजार ६०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या नव्याने टाकणे, जुन्या-जीर्ण जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे करणे, घरोघरी पाणी मीटर बसविणे आणि ८२ साठवणूक टाक्यांची कामे करणे अशा तीन टप्प्यात कामे करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात निवासी आणि व्यावसायिक मिळकती मिळून तीन लाख पाणी मीटर बसविण्याचे प्रस्तावित आहे. ही प्रक्रियाही सुरू झाली आहे.

नागरिकांना आवाहन

पाणी मीटर जोडणी आणि अन्य कामांसाठी पैशांची मागणी होत असेल तर पैसे देऊ नयेत, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. हा खर्च नागरिकांनी देणे अपेक्षित नाही. ठेकेदार कंपनीलाही तशी सूचना देण्यात आली आहे. ठेकेदाराकडून पैशांची मागणी होत असल्यास त्याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करावी आणि पाणी मीटर बसविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here