बाणेरच्या बिटवाईज सर्व्हिस रस्त्याचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार

महाराष्ट्र बुलेटिन : आज बाणेर बालेवाडीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी त्यांच्या प्रभागात बिटवाईज सर्व्हिस रस्ता भूमिपूजन समारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना कार्ड वाटप, नगरसेवक श्री. हेमंतजी रासने यांची सलग तिसऱ्यांदा पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर यांची शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व कु. सुमित तापकीर याने खेलो इंडिया विंटर गेम्समध्ये सुवर्णपदक व रौप्यपदक पटकावल्याबद्दल सत्कार समारंभ असे तीनही कार्यक्रम एकत्रितपणे आयोजित केले होते.

यावेळी बिटवाईज सर्व्हिस रस्ता भूमिपूजन समारंभ भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते पार पडला. आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात जवळपास ३०० नागरिकांना कार्डचे वाटप झाले असल्याचे नगरसेवक बालवडकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, प्रभागातील नागरिकांनी कोरोनाच्या सूचनांचे पालन करत उपस्थिती दर्शविली. यावेळी जगदीश मुळीक यांनी आपल्या भाषणात प्रभागातील विकासकामे मार्गी लागल्याने नगरसेवक बालवडकर यांचे कौतुक केले. हेमंत रासने यांनी देखील त्यांच्या भाषणादरम्यान बालवडकरांच्या कामाचा गौरव केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here