शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके आणि माऊली फाऊंडेशनच्या सहयोगाने वाघोलीमध्ये सुरु असलेल्या मोफत लसीकरण मोहिमेस प्रचंड प्रतिसाद

महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आणि माऊली फाऊंडेशनच्या सहयोगाने वाघोलीमध्ये मोफत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून अवघ्या ८ ते ९ दिवसात ३ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी आपले लसीकरण करून घेतले आहे.

काल सोमवारी ज्ञानेश्वर कटके यांनी सदर लसीकरण केंद्राला भेट दिली आणि लसीकरणासाठी आलेल्या सर्व नागरिकांची विचारपूस केली. या ठिकाणी त्यांची सोय कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे याचीही पाहणी केली आणि लवकरात लवकर वाघोली परिसर कोरोनामुक्त करण्याचा जो त्यांचा मानस आहे तो निश्चितच या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे.

यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की जे पात्र नागरिक अद्याप लसीकरणापासून वंचित राहिले असतील त्या सर्वांनी लवकरात लवकर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात नोंदणी करून या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा आणि शासनाला सहकार्य करावे व आपल्या स्वतःचेही या प्राणघातक महामारीपासून संरक्षण करावे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here