Skip to content Skip to footer

क्षमते पेक्षा मुंबईत चारपट पाऊस पडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली – मुख्यमंत्री….

मुंबईच्या ड्रेनच्या क्षमतेपेक्षा चौपट पाऊस झाला आहे. नाल्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झालेला असल्याने मुंबईत अशी परिस्थिती झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे नालेसफाई झाली नाही असे म्हणणे चुकीचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत गेले दोन दिवस सातत्याने कोसळणाऱ्या पावसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या आपाातकालीन विभागात हजेरी लावली. मुंबईतील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर बोलताना त्यांनी मुंबईत अशी स्थिती का निर्माण झाली याची माहिती दिली.

आतापर्यंत झालेला पाऊस इथल्या ड्रेन क्षमतेपेक्षा चारपट अधिक झाला आहे. त्यामुळे 2 पंपिंग स्टेशन उभी राहत नाही, तोपर्यंत पूर परिस्थिती पूर्णपणे थांबवता येणार नाही. 7 पैकी 5 पंपिंग स्टेशन सध्या कार्यरत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5