Skip to content Skip to footer

२५ वर्षांपासून रखडलेला सिंचन प्रकल्प आदित्य ठाकरेंनी लावला मार्गी

२५ वर्षांपासून रखडलेला सिंचन प्रकल्प आदित्य ठाकरेंनी लावला मार्गी

सोलापुरातील मोहोळ तालुक्यात असलेल्या सारोळे गावातील आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक २ या योजनेचा भूमिपूजन सोहळा आज शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. हा प्रकल्प गेली २५ वर्षे रखडलेला होता. प्रकल्प व्हावा यासाठी संघर्ष समितीने गेल्या २५ वर्षात अनेक प्रयत्न केले होते. अखेर आदित्य ठाकरेंनी पाठपुरावा करून हा प्रकल्प मंजूर करून घेतला.या प्रकल्पामुळे २००० एकर जमीन पाण्याखाली येणार आहे.

२५ वर्षे पाठपुरावा करून हवालदिल झालेल्या संघर्ष समितीने यावर्षी १२ फेब्रुवारीला आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात त्यांची भेट घेऊन निवेदन दिलं होतं. यावेळी आदित्य ठाकरेंनी “मी काही करू शकलो तर नक्की करेन” असं वचन दिलेलं होतं. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी सदर बाब संबंधित खात्याचे मंत्री विजय शिवतारेंच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर केवळ चारच दिवसात विजय शिवतारेंनी प्रकल्पाचा आराखडा बनवून संघर्ष समितीला मंत्रालयात बोलावून घेतलं. आदित्य ठाकरे आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा आराखडा समितीसमोर सादर केला गेला आणि प्रकल्प मार्गी लागला. केवळ चार दिवसात २५ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाच्या कामाचा आराखडा केल्याबद्दल आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणात शिवतारेंच कौतुक केलं.

दिलेला शब्द आम्ही पाळला आणि पाळणार

“दिलेला शब्द मी पाळला आणि असच पाळत राहणार आणि हेच आम्ही महाराष्ट्रभर करणार” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी हा प्रकल्प आगामी सहा महिन्यात पूर्ण करू असं स्पष्ट केलं आहे. २५ वर्षे वाट पाहून संघर्ष केल्याबद्दल आदित्य ठाकरेंनी संघर्ष समितीचं सुद्धा कौतुक केलं.

 

युवासेनेचा दणका:विद्यार्थ्यांना थकीत फी परत मिळाली

Leave a comment

0.0/5