राज्य शासनाच्या मेगा भरतीचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. मराठी आरक्षणाच्या सुधारणा विधेयकावर राज्यपाल यांच्या स्वाक्षरी नंतर राजपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे शासनाच्या विविध भागात रिक्त असलेल्या जागेवर लवकरच भरती करून त्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.
मराठा समाजाला शिक्षणा मध्ये १२ टक्के आणि नॊकरी मध्ये १३ टक्के आरक्षणाचा कायदा येत्या १ जुलै पासून लागू झालेला आहे. आठवड्याभरात पहिल्या टप्याच्या नोकर भर्तीला सुरवात सुद्धा होणार आहे. आता पर्यंत साधारण २० हजार पदांसाठी जाहिरात निघालेली आहे. तर उर्वरित जागेसाठी लवकरच जाहिरात काढण्यात येईल अशी माहित सुद्धा देण्यात आलेली आहे.
कुठल्या विभागात किती जागेसाठी भरती होणार आहे जानूया
१) ग्राम विकास विभाग – १३००० पद
२) कृषी – १५८५ पद
३) वन सौरक्षण – १५०० पद
४) सार्वजनिक बांधकाम – ४३५ पद
५) जलसंधारण – २५० पद
६) आरोग्य – ८०० पद
७) वित्त – ९५९ पद