Skip to content Skip to footer

सर्वाधिक मराठा मतदार शिवसेनेच्या पाठीशी-सर्व्हे

सर्वाधिक मराठा मतदार शिवसेनेच्या पाठीशी

लोकसभा निवडणुकीनंतर महिन्याभरात हायकोर्टात मराठा आरक्षण निर्णयावर सुनावणी झाली. यात मराठा आरक्षण कायम राहिलं. शिवसेना भाजप सरकारने मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा मतदान मोठ्या प्रमाणावर युतीच्या बाजूने वळणार असल्याचं चित्र आहे. लोकनीती आणि सीएसडीएस संस्थेने लोकसभा निवडणुकीनंतर केलेल्या सर्व्हेमध्ये सर्वाधिक मराठा मतदार शिवसेनेच्या पाठीशी असल्याचं समोर आलं आहे.

२०१४ विधानसभा आणि २०१९ लोकसभा या दोन्ही निवडणुकांत सर्वाधिक मराठा मतदान शिवसेनेच्या पारड्यात पडलं आहे. या अहवालानुसार युतीला ५९% मराठा समाजाचं मतदान मिळालं. यात शिवसेनेला तब्बल ३९% मराठा मतदारांनी कौल दिला आहे तर २०% मराठा मतदारांनी भाजपच्या पारड्यात मत टाकलं आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपची मतं ४ टक्क्यांनी घटून २०% वर आली आहेत. मराठा वर्ग हा पूर्वी काँग्रेसच्या बाजूने होता. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तो राष्ट्रवादीकडे वळला. पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रमुख मतदार असलेला हा वर्ग आता युतीकडे आणि त्यातल्या त्यात शिवसेनेकडे वळला आहे.

हाराष्ट्रातील तब्बल ३९% मतदारांनी शिवसेनेलाच मतदान केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला याचा नक्कीच फायदा होणार असल्याचं चित्र आहे.

आपले हे ऋण कधीच विसरू शकणार नाही-मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार

Leave a comment

0.0/5