आदित्य ठाकरेंनी सख्ख्या भावापेक्षा जास्त बंधुभाव दिला-मुस्लिम बांधव

बंधुभाव

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद दौऱ्याचा पहिला टप्पा पार पडला. या दौऱ्याला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांची मनं जिंकण्यासाठी काढलेल्या या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंच्या सभांमध्ये अनेक विरोधकांनी शिवसेनेत प्रवेश केला.अनेक ठिकाणी आदित्य ठाकरेंना सर्व धर्मांच्या धर्मगुरूंनी आशीर्वाद दिले. ठिकठिकाणी मुस्लिम समाजाच्या लोकांनी आदित्य ठाकरेंचं मोठ्या आनंदात आदरपूर्वक स्वागत केल्याचं चित्र दिसलं. “महाराष्ट्र बुलेटिन”ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मुस्लिम तरुणांनी आदित्य ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

बंधुभाव

आदित्य ठाकरेंनी आम्हाला सख्ख्या भावापेक्षाही जास्त बंधुभावाची वागणूक दिली अशी प्रतिक्रिया त्यांनी “महाराष्ट्र बुलेटिन”शी बोलताना दिली आहे. आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मिळालेलं हे मोठं यश मानलं जातं. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत बेहरामपाडा या मुस्लिमबहुल मतदारसंघात चक्क शिवसेनेचा भगवा फडकला होता. आता महाराष्ट्रातील मुस्लिम समाज शिवसेनेकडे वळल्यास शिवसेनेला याचा प्रचंड फायदा होऊ शकतो.

पारनेर जवळील ढोकी गावातील मुस्लिम तरुण आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभेला शिवसेनेचा भगवा शेला खांद्यावर घेऊन आणि मुस्लिम समाजाची पारंपरिक टोपी घालून उपस्थित होते. त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता मुस्लिम समाज शिवसेनेसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्हाला हिंदू-मुस्लिम भांडण लावणाऱ्यांपेक्षा शिवसेना जास्त प्यारी आहे असं सांगितलं. आदित्य ठाकरेंनी आमच्याशी हस्तांदोलन करून आमच्यात कोणतंही अंतर नसून बंधुभाव असल्याचं दाखवून दिलं आहे त्यामुळे आम्ही शिवसेनेचा आणि छत्रपतींचा नारा देणार असं या मुस्लिम युवकांनी ठामपणे सांगितलं.

आम्ही आदित्य ठाकरे यांच्या पाया पडत होतो. मात्र त्यांनी आम्हाला उचलून पाय पडू नका असं म्हणत हात मिळवला आणि आमची गळाभेट घेतली. एवढा बंधुभाव तर सख्खा भाऊही आपल्या भावाशी ठेवत नाही. शिवसेनेत येण्यात आमचा कोणताही स्वार्थ नसून केवळ शिवसेनेचे विचार, भावना आणि काम पटल्यानेच आम्ही शिवसेनेसोबत आहोत असं पठाण हुसेन या तरुणाने सांगितलं. आमच्या गावातील जोगेश्वर मंदिर मुलाचं काम फक्त शिवसेनेनेच केलं. त्यावेळी त्यांनी मुस्लिमांसाठी काम करणार नाही असं म्हटलं नाही. त्यामुळेच आम्ही शिवसेनेसोबत आहोत असंही ते म्हणाले.

बंधुभाव

विकास फक्त शिवसेनेमुळे झाला

आमचं छोटंसं गाव असून इथे काहीच विकास होत नव्हता, तो फक्त शिवसेनेमुळे झाला. आम्ही शिवसेनेचं काम पाहून शिवसेनेसोबत असल्याचं दुसऱ्या एका मुस्लिम तरुणाने सांगितलं. यावरून महाराष्ट्रातील मुस्लिम समाज शिवसेनेकडे ओढला जात असल्याचं दिसून येतं.

“प्रश्न समजला, जागच्या जागी सोडवला” असणार नवी ठाकरी शैली?

3 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here