इम्तियाज जलील यांचा उन्माद:दुष्काळग्रस्त संभाजीनगरात केला पाण्याचा अपव्यय

इम्तियाज जलील

 

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी काल संभाजीनगर शहरात विजयी रॅली काढली होती. या रॅलीमध्ये एमआयएम कार्यकर्त्यांचा विजयी उन्माद पाहायला मिळाला. संपूर्ण मराठवाडा आणि संभाजीनगर दुष्काळात होरपळून निघत असताना या रॅलीत मात्र हजारो लिटर पाण्याची उधळण करण्यात आली. निवडणूक काळात खैरेंच्या विरुद्ध प्रचार करताना आपल्याला नागरिकांच्या समस्यांची मोठी जाण आहे असं दाखवणारे खासदार इम्तियाज जलील यांच्यासमोर हे कृत्य एमआयएम कार्यकर्त्यांनी केलं. यावेळी इम्तियाज जलील मूग गिळून बसल्याचं पाहायला मिळालं. संभाजीनगरात अजूनही हवा तेवढा पाऊस झाला नसून कृत्रिम पाऊस पाडण्याची चाचपणी सुद्धा करण्यात आली आहे. असं असतानाही खासदार जलील यांच्या रॅलीत पाण्याची नासाडी करण्यात आल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा निसटता पराभव करून जलील खासदार म्हणून विजयी झाले आहेत. खासदारकीची निवडणूक लढवताना लोकांच्या समस्यांची जाण असल्याचा आव आणणाऱ्या इम्तियाज जलील यांनी विजयी झाल्यानंतर केवळ दोन महिन्यातच असा उन्माद दाखवल्याने सर्वच स्तरांतून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पाणी प्रश्न सोडवणे दूरच, उलट खासदारांनीच हजारो लिटर पाणी आपल्या शक्तिप्रदर्शनासाठी वाया घालवल्याने आता तक्रार तरी कोणाकडे करावी असा प्रश्न संभाजीनगरकरांना पडला आहे.

माझ्याविरोधात काम केलेल्यांना चिरडून मारू, इम्तियाज जलील यांची काँग्रेस नगरसेवकाला धमकी

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here