Skip to content Skip to footer

जेंव्हा भाजप कार्यकर्ताच म्हणतो आदित्यसाहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हायला हवं!

जेंव्हा भाजप कार्यकर्ताच म्हणतो आदित्यसाहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हायला हवं!

शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. “ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी दिली नाहीत त्यांची मनं जिंकायची आहेत” असा दृष्टिकोन ठेऊन आदित्य ठाकरेंनी ही यात्रा काढली आहे. ही यात्रा निवडणूक प्रचारासाठी काढली नसून माझ्यासाठी ही तीर्थयात्रा आहे असं आदित्य ठाकरे आपल्या भाषणात आवर्जून सांगतात. विरोधकांची मनं जिंकण्याचा आदित्य ठाकरेंचा हेतू या यात्रेदरम्यान सफल होताना दिसतो. एकेकाळी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे आदित्य ठाकरेंच्या प्रभावामुळे शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवाय आदित्य ठाकरेंच्या अनेक सभांमध्ये राष्ट्रवादीसह काँग्रेस,मनसे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत.

यापूर्वी आदित्य ठाकरेंवर प्रभावित होऊन एका मनसैनिकाने आदित्य ठाकरेंना “मनसे शुभेच्छा” दिल्या होत्या. आता भाजप कार्यकर्त्याने “आदित्यसाहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हायला हवं!” अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्यामुळे शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपमधील कार्यकर्त्यांनाही आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची आणि स्वीकारण्याची इच्छा असल्याचं समोर आलं आहे.

BJP Supporter wants AUT as MH CM fb

 

आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार असून शिवसेना-भाजप युती शेवटपर्यंत टिकणार का? याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. युती राहिली तर मुख्यमंत्रीपद कोणाकडे किती काळ असेल? शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळाल्यास मुख्यमंत्री कोण होईल? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. मध्यंतरी भाजपच्या काही नेत्यांनी “मुख्यमंत्री भाजपचाच” असा दावा केला होता. मात्र मुख्यमंत्री फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी असं कोणतंही विधान केलेलं नाही. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या “सामना” मधून तसेच आपल्या भाषणांतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी “आमचं ठरलंय” असं म्हणत युतीचा “समसमान” फॉर्म्युला ठरेलला आहे असं स्पष्ट केलं आहे. मात्र भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमदारांची मेगाभरती सुरु असल्याने भाजप पुन्हा युती तोडण्याच्या मार्गावर असल्याचीही चर्चा रंगली.

असं असताना एका भाजप कार्यकर्त्यांने आदित्य ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं मत सोशल मीडियावर मांडल्याने आदित्य ठाकरेंनी भाजप कार्यकर्त्यांची सुद्धा मनं जिंकली असल्याची बाब समोर आली आहे. शिवसेनेच्या एका फॅनपेजवर आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान टिपलेला फोटो पाहून या भाजप समर्थकाने ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Leave a comment

0.0/5