सदा सरवणकरांनी ७००० कुटुंबांना मिळवून दिलं हक्काचं घर

सदा सरवणकरांनी ७००० कुटुंबांना मिळवून दिलं हक्काचं घर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आता केवळ दहा दिवसांचा अवधी उरला आहे. सर्वच उमेदवार जनतेला आपल्या बाजूने खेचण्याची कसरत करताना दिसत आहेत. विद्यमान आमदार आपण केलेली कामं सांगून पुन्हा आपल्यालाच संधी द्यावी असं आवाहन जनतेला करत आहेत. महाराष्ट्रभरातील काही विद्यमान आमदारांनी विशेष कामगिरी केली आहे. यापैकीच एक माहीम-दादर-प्रभादेवी मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर. २०१४ च्या निवडणुकीत जनतेने सरवणकरांना विजयी केलं. यानंतर त्यांनी ७००० कुटुंबियांना घर मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. विशेष म्हणजे मंत्रिपद नसतानाही एवढी मोठी कामगिरी फार थोड्या आमदारांनी बजावली आहे. जाणून घेऊयात सदा सरवणकरांच्या याच कामगिरीबद्दल.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईतील ४० लाख झोपडपट्टीवासीयांना मोफत घर देण्याचे स्वप्नं होते. आमदार सरवणकरांनी हे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातील गोरगरीब झोपडपट्टीवासीयांना घरं देण्याचं ध्येय ठेवलं. आपला विभाग झोपडपट्टीमुक्त करण्याचे ध्येय उराशी बाळगून एसआरए योजना लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले. याद्वारे जवळपास ७००० कुटुंबांना हक्काचे पक्के घर देण्यात त्यांना यश आले आहे. आणखी गरीब कुटुंबांना आगामी काळात हक्काचं छत मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

महाराष्ट्रभरातील मंत्री वगळता आमदारांच्या कामगिरीचा विचार केला असता सदा सरवणकर यांची ही कामगिरी माहीमच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे. श्री साई सुंदर नगर संकुल या नावाने ४००० कुटुंबांना मायेची सावली देणारी वसाहत त्यांनी वसवली आहे. प्रभादेवी भागात गरिबांना कुशीत घेणारी ही वसाहत वसली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here