औरंगाबादेत दीड कोटी खर्चून उभारणार शिवरायांच्या २१ फुटी पुतळा

क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची उंची २१ फुटांनी वाढवण्याचा काम सुरू आहे. यानुसार महानगरपालिकेने अंदाजपत्रक तयार केले आहेत यासाठी जवळपास दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. क्रांती चौक उड्डाणपूल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमींकडून केली जात होती.

याविषयी मराठा क्रांती मोर्चा यांनी वेळोवेळी आंदोलन केले होते, त्यानंतर आठवड्याभरापूर्वी पुन्हा मराठा क्रांती मोर्चा व शिवप्रेमींनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली होती. सर्वसाधारण सभेत यासंदर्भात ठराव झाल्यानंतरही त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यामुळे शिवप्रेमींनी अनेक वेळा महापालिकेत धाव घेऊन पदाधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. त्यानंतर पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर पुतळ्यासाठी चबुतरा तयार करणे, सुशोभीकरणाचे काम गायत्री आर्किटेकला एक कोटी ८४लाख ५३ हजार ५७२ रुपयांत देण्यात आले.

महापालिकेने कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही गायत्री अर्किटेक्टतर्फे काम करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे दोन वेळा महापालिकेने कंत्राटदाराला गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली. त्यानंतर सध्या काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान येथील पुतळा मडीलगेकर आर्ट गॅलरी येथे ठेवण्यात आला असून, क्रांती चौकात नवा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. २१ फूट उंचीची अश्वारूढ नवीन पुतळा उभारण्यासाठी जुलैमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे. पुतळ्यासाठी शिल्पकाराकडून दरपत्रक मागवून अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

त्यानुसार सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्रॉंझ धातूंमध्ये सुमारे २१ फूट उंचीचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा तयार करून बसविला जाणार आहे. यासंबंधीचा प्रशासकीय प्रस्ताव येत्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीकरिता सादर करण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम पुढील वर्षीच सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here