शिवनेरी गडावरून मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

शिवनेरी | http://www.easyhindityping.com/marathi-to-english-translation

उद्धव ठाकरे ह्यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यावर ते शिवनेरी गडाच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच शिवनेरी गडाचा दौरा करणार असल्याने या दौऱ्याला विशेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या निमित्ताने ते शिवनेरीवरुन शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याची घोषणा करण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे. हा दौरा ऐतिहासीक ठरावा म्हणुन कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ही भेट शरद पवार यांच्या वाढदिवशी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

मुख्यमंत्री हे गड किल्ले प्रेमी असून गड किल्ले संवर्धनासाठी आग्रही आहेत. दरम्यान, राज्य शासनाच्या वतीने २००२ पासून शिवनेरी संवर्धन आणि विकास सुरु आहे. यामुळे हा किल्ला संवर्धनाचा माॅडेल ठरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य गड किल्ले संवर्धन आणि विकास महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी जुन्नरची सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेने केली होती. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी गडकिल्यांच्या संवर्धनसाठी २० कोटी मंजूर केले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here