महाराष्ट्राला इको-फ्रेंडली दिशा पुणे देऊ शकते – आदित्य ठाकरे

आदित्य-ठाकरे-दहिसर-Aditya-Thackeray-Dahisar

महाराष्ट्राला इको-फ्रेंडली दिशा पुणे देऊ शकते – आदित्य ठाकरे

पुण्यात इको-फ्रेण्डली मटेरिअल वापरले जातात. त्यामुळे महाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते असे मत पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात ते ‘कार्बन न्यूट्रल २०३० कॉन्फरन्स’नंतर माध्यमांशी बोलत होते. पुणे ‘कार्बन न्यूट्रल’ करण्यासाठी २०३० लक्ष आहे. मात्र, पुणे २०२५ मध्येच ते पूर्ण करेन, अशी अशा यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच, पुण्यातील सॉलिड वेस्ट मटेरिअल मॉडेल मुंबईत आणणार, त्याचबरोबर बांबू आणि कापडी पिशवी ही संकल्पना राज्यातच नाही देशात देण्याची गरज आहे, असे ही आदित्य ठाकरे म्हणाले.

आरे कॉलनीतील मेट्रोचे शेड आणि नवी मुंबईतील गोल्फ क्लबसह इतर प्रकल्पाच्या स्थगितीवरुन सरकारवर आरोप होत आहेत. मात्र, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या विरोधात असेल तिथे स्थगिती दिली जाईल. पर्यावरणाची हानी होणार नाही, पर्यावरणाला धोका होणार नाही, ही आमची भूमिका असल्याचे ठासून सांगितले.

सरकार पर्यावरणासाठी सकारात्मक असून महाराष्ट्राला जगातील सर्वोत्कृष्ट राज्यात आणणार असल्याचे सांगितले. राज्यात पर्यावरणाला हानी होणाऱ्या ठिकाणी स्थगिती दिली जाईल. मेट्रोचे काम थांबलं नसून वस्तूस्थिती जाणून घेतली पाहिजे. तुम्हाला जर झाडं तोडायची असेल तर करा, अशी संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

पुण्यात शिवभोजनाला उस्फुर्त प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here