नियम न पाळणाऱ्या कंपन्यांवर कारवाही करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

नियम-न-पाळणाऱ्या-कंपन्या-Companies that do not follow the rules

नियम न पाळणाऱ्या कंपन्यांवर कारवाही करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

 डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमुळे निर्माण होणारे रासायनिक प्रदुषण त्याचप्रमाणे सदर परिसरातील रहिवाशांना होणारा त्रास यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी प्रदूषण महामंडळाने दिलेल्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या कंपन्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधित खात्याला दिलेले आहे. काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे महानगर पालिकेच्या विविध कार्यक्रमाचे लोकार्पण आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले.

                   औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांची तपासणी करून वर्गवारी करण्यात येईल तसेच शासन यंत्रणा कारखान्यांची तपासणी करून सूचित केलेली सुरक्षा उपकरणे कारखाना मालकांनी त्यांच्या कारखान्यांमध्ये तातडीने लावण्यात यावे असे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. कारखान्यातून सोडण्यात येणारी घातक रसायने वाहून नेण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करणे, औद्योगिक वसाहतींना लागून ज्या ठिकाणी नागरी वस्ती आहे त्याठिकाणी सर्वेक्षण करून सदर घातक रासायनिक कारखाने अन्यत्र हलविण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला मुख्यमत्र्यांनी दिलेले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here