माटुंगा रेल्वे स्थानकात महिलांची छेड काढणाऱ्या इसमाला शिवसैनिकाचा चोप

माटुंगा-रेल्वे-स्थानकात-At the Matunga-railway station

माटुंगा रेल्वे स्थानकात महिलांची छेड काढणाऱ्या इसमाला शिवसैनिकाचा चोप

                माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांना छेड काढणारा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी पकडून चांगलाच चोप दिला आहे. काल नांदगावकर यांनी आपल्या फेसबुक वॉल वरून सदर इसमाला चांगलाच धडा शिकविल्याचा व्हिडिओ शेअर केला. तसेच तमाम माता बहिणींच्या मागे उभे राहत, असे कृत्य करणाऱ्या विकृतीला धडा शिकवण्याची शपथ घेतली आहे.

                माटुंगा रेल्वे स्थानक इथे छेडछाड करण्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला होता. मात्र समोर कोणी येऊन तक्रार न केल्याने आरोपीला सोडून देण्यात आले होते. हे आरोपी मोकाट राहिले आणि यांना धडा शिकवला नाही तर हे असेच कृत्य करतील यासाठी शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी या छेड काढणाऱ्या तरुणाला शोधून काढले आणि चांगलाच चोप दिला. याचा व्हिडियो त्यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केला आहे.

                 नितीन नांदगावकर यांनी छेड काढणाऱ्या या तरुणाचा पंधरा दिवसापासून शोध घेत होते. याला पकडून चांगलाच चोप दिला आला आहे. चोप दिलेलेला व्हिडीओ नितीन नांदगावकर यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर पोस्ट केला आहे. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे अशा विकृत माणसाला धडा शिकवायला हवा. म्हणून मी त्याला असा धडा शिकवला आहे. पोलिसांनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल, पण मी असे कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही, असे त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

चुकीला माफी नाही …..PART 1महाराष्ट्रातील माझ्या माता -भगिनींना समर्पित …..जिथे जिथे मुलींवर अत्याचार होतील आणि ते नराधम वासनेने पछाडलेले मोकाट फिरत असतील तिथे तिथे जाऊन त्यांना ठोकणार …..हात-पाय शाबूत राहणार नाहीत हा माझा शब्द ……मग तो कोणत्याही जाती-धर्मचा असुदेत त्याची धिंड काढली जाईल …हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून महाराष्ट्रातील तमाम माता -भगिनींच्या संरक्षणाची जवाबदारी घेतो ……रयतेच्या राज्यात माता -भगिनींना ह्यापुढे कोणीच वेड्या वाकड्या नजरेने बघू नये !!५ दिवस रोज माटुंगा ब्रिज वर येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना कुठेही हात लावून पसार होणारा विकृत त्याची हिम्मत होते कशी ?१५ दिवसा पासून वाट पाहत होतो …गेले कित्येक दिवस त्याला शोधण्यात गेले कारण त्याचा घरचा पत्ता खोटा …या विकृताची जवाबदारी कोण घेणार …?म्हणून अशा विकृतीचे जागेवर हात छाटले गेले पाहिजेत बस ……मला पर्वा नाही माझे काय होईल याची पण अशा समाजकंटकांना नागडा करणार !!शिवसैनिकTo be continue ……..

Posted by Nitin Nandgaonkar on Monday, 17 February 2020

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here