डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नाना पाटोलेंनी दिले आदेश.

डॉ-बाबासाहेब-आंबेडकराचे-Dr.-Babasaheb-Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदूमिल या जागेत उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेले आहे. प्रत्यक्ष कामाची प्रगती पाहण्यासाठी आज स्वतः सर्व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह स्मारकाच्या जागेस भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे, शिवसेना खासदार राहुल शेवाळे सुद्धा उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी आंबेडकर अनुयानांची भावना आहे. त्यामुळे ‘एमएमआरडीए’ने स्मारकाचे काम युद्धपातळीवर करावे. स्मारकाच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय विद्यापीठ व्हावे, अशी मागणी आहे. याबाबतची शक्यता पडताळून पहिली जात आहे. श्री. बनसोडे यांनीही स्मारकाचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच श्री. शेवाळे यांनी स्मारक व चैत्यभूमी यांना जोडणारा रस्ताही करण्यात यावा, अशी सूचना करून चैत्यभूमीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली.

यावेळी स्मारकाच्या कामाचा वेग वाढवावा, स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार हे सांची स्तुपाच्या रुपात असावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर स्टॅच्यू ऑफ इक्विटी असे लिहावे. सुसज्ज ग्रंथालय असावे, स्मारकाच्या ठिकाणी सामाजिक न्याय विद्यापीठ स्थापन करावे, डॉ. आंबेडकर यांचे संघर्ष दाखविणारे चित्रण, विविध आंदोलनाचे चित्रण तसेच त्यांचे आई-वडील, पत्नीचे शिल्प रेखाटावे, डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचे प्रदर्शन दालन उभारावे आदी मागण्या राहुल शेवाळे यांच्या तर्फे मांडण्यात आल्या होत्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here