वर्ध्यात ११२ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले १ कोटी ५ लाख…

वर्ध्यात-११२-शेतकऱ्यांच्-Wardha-e-Farmers

ठाकरे सरकारने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर केली असून, याआधी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत ६८ गावांतील १५,३५८ शेतकऱ्यांचा समावेश होता. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील २ गावांचा समावेश होता. त्यांनतर आता कर्जमाफीची दुसरी यादीही जाहीर झाली असून, वर्धा जिल्ह्यातील दुसऱ्या यादीतील ही माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील ४६ हजार ४२४ शेतकऱ्यांचा दुसऱ्या यादीत समावेश आहे. आधार प्रामाणिकरणाची प्रक्रिया वर्धा जिल्हा प्रशासनाकडून सुरु करण्यात आली आहे. पहिल्या यादीत वर्ध्यातील दोन गावांमधील १६६ शेतकऱ्यांचा समावेश होता. ज्याअंतगर्त त्यातील १५४ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. उर्वरित १२ पैकी ८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण न झाल्याने, तर चार शेतकरी मृत असल्याने सध्या लाभापासून वंचित आहे.

आधार ऑथेंटिकेशन न झालेले शेतकरी आधार नंबर बँक अपलोड करतील किंवा कोण याबाबत चर्चा सुरु आहे. तर १ कोटी ५ लाख ९४ हजार रुपये १५४ शेतकऱ्यांपैकी ११२ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात ६१०८४ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी ५८ हजार ७३३ शेतकऱ्यांचे आधार अपडेट आहे. तर ११ हजार १४३ शेतकऱ्यांची यादी अद्यापही बाकी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here