माणगांव परीषदेच्या शताब्दी महोत्सवाच्या पुर्वतयारीची खासदार मानेंनी केली पाहाणी.

  याच पार्श्वभूमीवर माणंगाव परिषद शताब्दी महोत्सव कार्यक्रमाचे महाराष्ट्र शासनातर्फे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाच्या निययोजनसाठी खासदार माने यांनी

माणगांव परीषदेच्या शताब्दी महोत्सवाच्या पुर्वतयारीची खासदार मानेंनी केली पाहाणी.

               कोल्हापूर येथे २१ व २२ मार्च १९२० साली विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत बहिष्कृत समाजाची पहिली ऐतिहासिक माणगांव परिषद पार पडली होती. या परिषदेला विशेष महत्व प्राप्त झाले होते. तसेच २१ मार्च २०२० रोजी या परिषदेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

      याच पार्श्वभूमीवर माणंगाव परिषद शताब्दी महोत्सव कार्यक्रमाचे महाराष्ट्र शासनातर्फे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाच्या निययोजनसाठी खासदार माने यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन मंत्री मुंडे यांनी हा कार्यक्रम शासनातर्फे नियोजन करण्याचे अश्वसन दिले होते तसेच बार्टी संस्थेला सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे आदेश दिले होते. याच कार्यक्रमाच्या पुर्वतयारीची पाहाणी खासदार मानेंनी केली असून त्यांच्या सोबत शासकीय शासकीय अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

    तसेच यावेळी खासदार धैर्यशील मानेंनी मुख्य कार्यक्रम स्थळ, पार्कींग व्यवस्था, कार्यक्रमस्थळाकडे येणारे रस्ते, पाणी, लाईट इत्यादी सह सर्वच बाबींचा संबंधीत शासकीय यंत्रणेकडुन आढावा घेवुन योग्य सुचना दिल्या. या वेळी माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई,जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख, मुख्यकार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रांताधिकारी डॉ.विकास खरात आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here