मतदारसंघात विविध सोहळ्यांना खा.डॉ. सुजय विखे यांची भेट !

मतदारसंघात-विविध-सोहळ्या-Various-ceremonies in the constituency

नगर जिल्ह्यात झालेल्या विविध नागरी सोहळ्यांना यांनी हजेरी लावली. गावभेट दौरा मध्ये त्यांनी विविध गावांना भेटी दिल्या व तेथील सोहळ्यांमध्ये आनंदाने सहभागी झाले.

काल पाथर्डी तालुक्यातील मढी येथे कानिफनाथांची यात्रा होती तेथे सहभागी होऊन त्यांनी कानिफनाथांचे दर्शन घेतले व यात्रे निमित्त आलेल्या भाविकांसमवेत आरती केली. तसेच पाथर्डी तालुक्यातील मढी येथे कैकाडी समाजाचा ‘मानाची काठी’ हा पारंपरिक उत्सव असतो. दरवर्षी मानाच्या काठीची यात्रा येथे काढली जाते व त्यानंतर यात्रेस सुरुवात होते. यावेळी आदरणीय नारायण बाबा यांचा त्यांनी सत्कार केला.

 

मतदारसंघात-विविध-सोहळ्या-Various-ceremonies in the constituency

मतदारसंघातील विविध उत्सवांमध्ये खा.डॉ. सुजय विखे आवर्जून हजेरी लावतात. आपल्या जिल्ह्यातील अनेक उत्सव व नागरिकांच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी व दुःखाच्या क्षणी सुद्धा ते जातीने उपस्थित असतात हे लोक नेहमीच सांगतात. आपल्या मतदारसंघातील संतांच्या कार्यक्रमात उत्साहाने ते हजेरी लावतात, त्यांच्या या साधेपणाने नागरिक त्यांना आवर्जून आमंत्रण देतात. आपल्या नेत्याची आपल्यासाठी व मतदारसंघासाठी असलेल्या आपुलकीपेक्षा आणखी काय हवे !

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here