कोरोना संदर्भात राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

कोरोना-संदर्भात-राज्याती-Corona-in-context-royalty

सध्या राज्यात कोरोना व्हायरसचे १० रुग्ण आढळले असून, हे सर्व पॉझिटिव्ह रुग्ण असले तरी ते गंभीर नसल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनही याच आठवड्यात संपवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. कोरोना व्हायरसबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरसबद्दल राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत लोकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले होते.

आता त्याच पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे मंत्रालयातून संवाद साधला. तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून खबरदारीचे उपाय योजना करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहे. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे आणि मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here