नाशिक मधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ लेखी आदेशाच्या प्रतीक्षेत – युवासेनेतर्फे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना निवेदन.

एकट्या-राहणाऱ्या-आजी-आजो-Single-living-grandparents

नाशिक मधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ लेखी आदेशाच्या प्रतीक्षेत – युवासेनेतर्फे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना निवेदन.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा, कॉलेज व विद्यापीठांना सुट्टी तसेच इतर निर्देश देण्यात आले आहेत. परंतु यास अपवाद ठरले ते नाशिकचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ. याठिकाणी कुठल्याही प्रकारचे लेखी निर्देश न मिळाल्याने विद्यापीठ प्रशासन, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब लक्षात येताच युवासेनेने याबाबतीत तातडीने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांना निवेदनाद्वारे मागणी केली. यामागणीमध्ये सदर विद्यापीठाच्या बाबतीत माहिती घेऊन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा अशी प्रमुख मागणी केली गेली.

तसेच या विद्यापीठाला कोरोना संदर्भात लेखी निर्देश देण्याची मागणी करत विद्यापीठातील परिस्थितीची माहिती मंत्री महोदयांना दिली. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत सुरु असलेल्या महाविद्यालयांना परिपत्रक प्रसिद्द करून अभ्यासक्रमाचे कामकाज विद्यार्थ्यांसाठी बंद ठेवणे, कोणत्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करणे व इतर बाबींवर तातडीने अधिकृत निर्देश देणारे पत्रक जारी करण्यात यावे, असे युवासेनेने निवेदनात नमूद केले आहे.

यासाठी युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आल्याचे युवासैनिकांद्वारे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here