थुंकणाऱ्यांवर कारवाही – मनपाने कारवाहीतून मिळविले १ लाख ११ हजार…

मनपाने कारवाहीतून मिळविले-Municipal Corporation Received

थुंकणाऱ्यांवर कारवाही – मनपाने कारवाहीतून मिळविले १ लाख ११ हजार…

सध्या राज्यात कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे मुंबई महानगर पालिकेने रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाही करण्याचे ठरविले आहे. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकल्यास १००० रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. कोराना व्हायरस हा संसर्गजन्य आजार असल्याने थुंकी मार्फतही पसरू शकतो. त्याची लागण इतर नागरिकांना होऊ शकते. यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतल्याची माहिती समजत आहे.

मात्र तरीही थुंकणाऱ्यांची सवय काही गेली नाही आणि काल मुंबई महापालिके केलेल्या कारवाईत अनेकांना आपला खिसा खाली करावा लागला आहे. मुंबई महापालिकेने दंड वाढवल्यानंतर एका दिवसात १०० जणांवर कारवाई करत ४६ जणांना वोर्निंग दिली. तर १११ जणांकडून तब्बल १ लाख ११ हजार रूपये इतका दंड वसुल करण्यात आला.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास याआधी २०० रूपये इतका दंंड आकारण्यात येत होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच पटीने हा दंड वाढवण्यात आला असला, तरीही मात्र थुंकोबांना काही त्याचं गांभीर्य नसल्याचं यातून दिसून येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here