मनसेच्या शॅडो मंत्र्यावर गुन्हा दाखल, कोरोनाग्रस्त रुग्णाचे नाव सोशल मीडियावर केले जाहीर.

मनसेच्या-शॅडो-मंत्र्यावर-On the Mens-Shadow-Mantra

मनसेच्या शॅडो मंत्र्यावर गुन्हा दाखल, कोरोनाग्रस्त रुग्णाचे नाव सोशल मीडियावर केले जाहीर.

कोरोना संशयित रुग्णाचे नाव सोशल मीडियावर जाहीर केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शॅडो मंत्री मंडळातील संजीव पाखरे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. काहीच दिवसापूर्वी मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी सुद्धा कोरोना रुग्णांची नावे जाहीर करावी, अशी मागणी शासनाकडे केली होती. परंतु जर अशी नावे जाहीर केली तर त्या रुग्णाच्या घरच्यांना याचा त्रास सहन करावा लागला असता.

आज सारा देश एकीकडे कोरोनाशी झुंज देत असताना काही राजकीय पक्ष यामागे हेतू पूर्वक राजकीय डाव साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पाखरे यांनी कोरोनाच्या संशयित रुग्णांची नावे सोशल मीडियावर व्हायरल केली आणि त्यांची ओळख उघड केली. मागच्या आठवड्यात कोरोनाचे तीन संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयातून पळून गेले होते.

या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाने त्याच्या विरोधात तोफखाना पोलीस स्थानकात पत्र दिले होते. हे पत्र संजीव पाखरे यांनी सोशल मीडियावर जाहीर केले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here