सध्या देशावर कोरोनाचे संकट उभे राहिलेले आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सर्वोतोपरी मदत करण्याचे आव्हान केले आहे. परंतु संकटात सुद्धा भाजपाने राजकारण करणे सुरूच ठेवले आहे. या संकटात राज्यातील जनता होरपळत असताना त्यांना मदत करणे सर्वांचे कर्तव्य आहे,’ असताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
कोरोना’विरुद्ध लढण्यासाठी अनेक जण मदतीचे हात पुढे करत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करत आहेत. मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकात पाटील यांनी मात्र भाजपाच्या सर्व आमदार, खासदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत व जिल्हा परिषद सदस्यांनी एक महिन्याचे वेतन भाजपाच्या आपदा मदत निधीला देण्याचे आवाहन केले आहे.
जनतेच्याच पैशातून मिळालेले हे वेतन सरकारच्या मदतनिधीत जमा न करता पक्षाच्या मदतनिधीत जमा करण्याचा प्रकार हा महाराष्ट्रद्रोहीच म्हणावा लागेल, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.