त्या अभिनेत्रीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

अभिनेत्रीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी Actress Chief Minister Uddhav Thackeray

सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये होत असलेल्या वाढीमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे कोरोनाच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे सरकारी यंत्रणा आणि हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेस यांची कमतरता भासू लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग सुद्धा अमर्यादित काळा पुरते थांबवण्यात आलेले आहे. मात्र जोगेश्वरी येथील मनपाच्या हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटरमध्ये चक्क एका अभिनेत्रीने रुग्णसेवा करण्यास सुरुवात केली आहे.

अभिनेत्री शिखा मल्होत्रा हिने रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अभिनेत्रीचे कौतुक केलं आहे. अभिनेत्री शिखाने २०१४ ला दिल्ली येथील वर्धमान महावीर मेडिकल कॉलेजमधून नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु अभिनयाची आवड असल्यामुळे तिने अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. नर्सिंगचे शिक्षक घेतल्यावर आम्ही समाजसेवेची शपथ घेतली होती. माझ्या मते हीच ती योग्य वेळ आहे समाजसेवा करण्याची अशी माहिती तिने आपल्या इन्स्ताग्राम अकाऊंट वरून दिलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here