तळेगाव दाभाडे येथे दोन दिवसीय लॉक डाउन – आमदार सुनील शेळके यांची माहिती.

तळेगाव-दाभाडे-येथे-दोन-दि-Talegaon-Dabhade-at-two-day

तळेगाव दाभाडे येथे दोन दिवसीय लॉक डाउन – आमदार सुनील शेळके यांची माहिती.

सध्या कोरोनाच्या थैमानाने संपूर्ण जगात चिंताजनक वातावरण आहे व महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. परंतु परिस्थिती नियंत्रणात असल्याचे देखील राज्य सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मावळ मतदारसंघाचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी तळेगाव दाभाडे या भागात संपूर्ण लॉक डाउन जाहीर केले आहे.

बारामती येथून येणारा भाजी विक्रेता कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सतर्क राहून येत्या ९ व १० एप्रिल रोजी तळेगाव दाभाडे येथे लॉक डाउन असणार आहे. यादरम्यान दूध विक्री व मेडिकल सुविधा सुरु राहणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. भाजी विक्रीसाठी येणाऱ्या भाजी विक्रेत्यांची चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना एक विशिष्ट पास देऊनच भाजी विक्रीसाठी मुभा देण्यात येणार आहे, असे शेळकेंनी सूचित केले.

सर्व नागरिक बंधू भगिनींनी आपल्या सुरक्षेसाठी लागू करण्यात आलेल्या या लॉक डाउनचे पालन करावेच आणि प्रशासन व प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आव्हान त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here