वरळी – कोळीवाडा येथे दारोदारी थर्मल चाचणी – एक रुपयात क्लिनिक उपक्रम युद्धपातळीवर सुरू.

वरळी-कोळीवाडा-येथे-दारोद-Worli-Koliwada-at-Darod

वरळी – कोळीवाडा येथे दारोदारी थर्मल चाचणी – एक रुपयात क्लिनिक उपक्रम युद्धपातळीवर सुरू.

देशातील वाढत कोरोनाचा आकडा लक्षात घेता संपूर्ण देशात महत्वपूर्ण उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच मुंबई मध्ये काही भागांमध्ये कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता वरळी कोळीवाडा येथे एक विशिष्ट उपाययोजना राबवण्यात येत आहे. “एका रुपयात क्लिनिक” असे या उपक्रमाचे नाव असून, ज्यामध्ये डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची एक टीम या परिसरातील प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहचणार आहे व कोरोना तपासणी साठी असलेल्या थर्मल पद्धतीने घरातील प्रत्येकाची चाचणी करणार आहेत.

वरळी-कोळीवाडा-येथे-दारोद-Worli-Koliwada-at-Darod

या कामासाठी महाराष्ट्र राज्य सरकार तसेच आमदार व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विशेष खबरदारीने सूचना केल्या आहेत. अशाप्रकारे चाचणी घेण्यात येत असल्याने या भागातील नागरिक चिंतामुक्त झाले आहेत. या कामासाठी मेहनत घेत असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांची देखील विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांना देखील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली सर्व सामग्री देण्यात आली असून, त्यांची सुद्धा विचारपूस केली जात आहे.

वरळी-कोळीवाडा-येथे-दारोद-Worli-Koliwada-at-Darod

त्यामुळेच आमदार आदित्य ठाकरे, राज्यसरकार व कार्यरत असलेल्या यंत्रणेचं लोकांकडून कौतुक ऐकायला मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here