व्हिएतनाम येथे अडकलेल्या तरूणाने खासदार धैर्यशील माने यांचे मानले आभार

महापुरामध्ये-नुकसान-झाले-Damage-Damaged

व्हिएतनाम येथे अडकलेल्या तरूणाने खासदार धैर्यशील माने यांचे मानले आभार
सध्या कोरोना या संसर्ग आजाराने भारताबरोबर संपूर्ण देशात हाहाकार माजविला आहे. आज भारताच्या तुलनेत इतर देशात याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसून येत आहे याचं पश्वभूमीवर भारताने सुद्धा इतर देशासाठी आपल्या सीमा बंद केल्या आहेत याचा फटका नोकरी आणि शिक्षणासाठी बाहेर गेलेल्या भारतीय नागरिकांना सहन करावा लागत आहे यातच नोकरीसाठी व्हिएतनाम येथे जहाजावर अडकलेल्या भारतीय तरुणाने तेथील आपबीती सुनावली व या संकटात मदत केल्याबद्दल शिवसेना खासदार ध्यैयशील माने यांचे आभार मानले.

कोरोना नावाच्या भयंकर विषाणूमूळे खुपजण मोठ्या संकटात अडकले आहेत. परंतु या संकटात खासदार ध्यैयशील माने देवदूतांच्या रूपाने मदतीसाठी धाऊन गेले आहे. व्हिएतनाम येथे जहाजावर अडकलेल्या कोल्हापुरातील रहीवाशी दर्शन जोशी कार्गो जहाजावर आपल्या विदेशी सहकारी यांच्या सोबत अडकले होते परंतु स्वतः शाहाकारी असल्यामुळे तसेच संधीवाताचा त्रास असल्याकारणाने त्यांचे अतोनात हाल त्यांना सहन करावे लागत होते. ही गोष्ट खासदार माने यांचे विश्वासू सहकारी अजित देशपांडे यांच्या मदतीने माने यांचे निकटवर्तीय जय घाडगे आणि खासदारांचे स्वीय सहाय्यक रणजित जाधव यांच्या मार्फत खासदार माने यांच्या पर्यंत बातमी पोहचली. बातमी पोहोचताच मानेंनी सूत्र हलवली.

#सर्व्हिसनिमित्त_व्हिएतनाम_येथेअसणाऱ्या_शिरोलीच्या_तरुणाने__मानले_धैर्यशीलदादांचे_आभार!मी, दर्शन प्रफुल्ल जोशी…

Posted by Dhairyasheel Mane on Wednesday, 8 April 2020

 खासदार माने यांनी दर्शन जोशी यांच्याशी चर्चा करून धीर दिला व तुझी लवकरच व्यवस्था करतो असे अश्वासन दिले. खासदार माने यांनी म्यानमार येथील राजकीय दुतावासांशी संपर्क केला तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी व सचिवांशी बोलून म्यानमार येथे दर्शन याला उतरण्याची परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न केले. खासदारांच्या सतर्कतेनंतर तपासणी करून म्यानमार राजकीय दूतावास मध्ये त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली या घटनेनंतर दर्शन जोशी यांनी खासदार ध्यैयशील माने व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here