एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी याला उस्मानाबाद जिल्ह्यात अटक

एबीपी माझा संपादक राABP My Editor

एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी याला उस्मानाबाद जिल्ह्यात अटक

काल वांद्रे येथे जमलेल्या परप्रांतीय कामगारांमुळे संपूर्ण वांद्रे परिसरात एकच गर्दी उसळली होती.या परप्रांतीय कारागिरांनी आपल्या मूळगावी परत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती . केंद्र सरकारने या कामगारांना आपल्या गावी जाण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था केल्याची बातमी एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी दाखवली होती. या खोट्या बातमीमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.

देशात पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती, तरीही एक जबाबदार पत्रकार म्हणून आपण काय दाखवत आहोत याची खबरदारी सुध्दा मीडिया समूहाने घेतलेली दिसत नव्हती. त्यातुनच अशी खोटी बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून आली. आज सकाळीच एबीपी माझाचे उर्वरित महाराष्ट्र पत्रकात राहुल कुलकर्णी याला उस्मानाबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून

बेजबाबदारपणे अफवा पसरवून लॉक डाऊन नियमांचा भंग करणारे वृत्तांकन व प्रसारण केल्या प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here