ग्रीन, ऑरेंज झोन मधील 29 जिल्ह्यात उद्योगधंदे सुरु करणार – सुभाष देसाई
कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी लॉक डाऊन जाहीर केला आहे. याचा सगळ्यात मोठा फटका उद्योग धंद्याना बसलेला आहे. याच पार्श्वभूमीवर रेड झोन वगळून ग्रीन, ऑरेंज झोन मधील 29 जिल्ह्यातील उद्योग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर येथील रेडझोन वगळून इतर जिल्ह्यात उद्योगधंदे सुरू करणे बाबत प्रस्ताव बनवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औद्योगिक स्थिती जाणून घेण्यासाठी नियुक्त केलेल्या कृतिदलाची सोमवारी मंत्रालयात त्यांनी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. तसेच ग्रीन, ऑरेंज झोन मधील उद्योग सुरू करण्यासाठी आराखडा तयार केला आहे व उर्वरित 12 जिल्ह्यात मात्र बंद कडकपणे राबविला जाणार आहे.