प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी कोरोना तपासणी शिबिर

प्रसार-माध्यमांच्या-प्रत-Media-copy

प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी कोरोना तपासणी शिबिर

सध्या कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्र समूहाच्या प्रतिनिधीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. आता याच पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार- छयाचित्रकारांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित विशेष कोरोना तपासणी शिबिरात उद्या दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १ पत्रकार- छयाचित्रकारांची तपासणी करण्यात येईल.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर, प्रेस क्लबच्या जवळ, फोर्ट येथे सुरू असलेल्या या शिबिरात मंत्रालय, बृहन्मुंबईत काम करणारे इलेक्ट्रिक व इतर प्रसार माध्यमांचे पत्रकार- छयाचित्रकार यांची तपासणी करण्यात येईल. आशा माहितीचे पत्रक बृहन्मुंबई मनपा कार्यालयातून काढण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी ठाणे येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशन अंतर्गत या उपक्रमाला सुरवात झालेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here