इचलकरंजी आणि हातकणंगले शहराचा ग्रीनझोन मध्ये समावेश करा – ध्येयशील माने

इचलकरंजी आणि हातकणंगले शह-Ichalkaranji and Hatkanangale Shah

इचलकरंजी आणि हातकणंगले शहराचा ग्रीनझोन मध्ये समावेश करा – ध्येयशील माने

इचलकरंजी आणि हातकणंगले शहराच्या आसपासचा भाग हा कोरोनामुक्त झाला आहे. या भागात सध्या कोरोनाग्रस्त एकही रुग्ण आढळून आलेला नाही आहे. त्यामुळे इचलकरंजी आणि हातकणंगले शहराचा ग्रीनझोन मध्ये समावेश करून इचलकरंजी मधील

वस्त्र उद्योग सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी खासदार माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. इचलकरंजी आणि आसपासच्या परिसरात लॉकडाऊन यशस्वीरित्या राबवला गेला, तसेच दुसऱ्या टप्यातील लॉकडाउनसुद्धा काटेकोरपणे पाळल्या जात आहे.

केंद्र सरकारने जाहिर केलेल्या नियमानुसार ग्रामीण भागातील औदयोगिक कारखाने सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. आज कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूर शहर ऑरेंज झोनमध्ये जाण्याची शक्यता आहे. याचा फटका इचलकरंजीतील औद्योगिक क्षेत्राला बसू शकतो. आज इचलकरंजी आणि ग्रामीण भागात कापड निर्मिती प्रक्रिया, गारमेंट सारखे उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत.

आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल कॅप, एन 95 मास्क आणि सर्जिकल मास्कची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. ही मागणी इचलकरंजी शहर आणि आसपासच्या वस्त्रोउद्योगांमध्ये पूर्ण करण्याची क्षमता आहे तसेच मास्क बनवण्यासाठी लागणाऱ्या कापडाची इचलकरंजी शहराकडे इतरत्र राज्याकडून मागणी वाढलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्यात इचलकरंजी आणि हातकणंगले तालुक्याचा ग्रीनझोन मध्ये समावेश करावा अशी मागणी खासदार माने यांनी केलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here