नागपूर शहर व ग्रामीण भागात शिवसेनेच्या वतीने अन्नधान्य वाटप

नागपूर-शहर-व-ग्रामीण-भागा-Nagpur-city-and-rural-area

नागपूर शहर व ग्रामीण भागात शिवसेनेच्या वतीने अन्नधान्य वाटप

राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे 3 मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे कष्टकरी,मोलमजुरी आणि हातावरचे पोट असलेल्या कामगारांचे अतोनात हाल होताना दिसत आहे. मात्र आता त्यांच्या मदतीला शिवसैनिक धाऊन आले आहेत. लॉक डाऊन झाल्यापासून नागपूर जिल्हा शहर व ग्रामीण या भागात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी गरजूंना अन्नधान्य वाटप व जेवणाची सोय करून दिली आहे. तसेच निशुल्क रुग्णवाहिका सेवा सुद्धा पुरवत आहेत.

नागपूर-शहर-व-ग्रामीण-भागा-Nagpur-city-and-rural-area

कामठीतील शिवसेना विभागप्रमुख देवेश ठाकरे यांनी गरजू पाच कुटूंबाची लॉकडाउन काळात अन्यधान्यची जबाबदारी उचली आहे. ज्यांना सरकार कडून मिळत असलेल्या धान्याची गरज भासत नाही त्यांनी हे धान्य गरजूंना देण्याचे आवाहन देवेश ठाकरे यांनी केले आहे. तसेच स्वखर्चाने दोनशे कुटुंबांना शिवसैनिकांनी अन्नधान्याच्या किटचे वाटप केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here