केंद्र सरकारचा दुपट्टीपणा, सत्ता असलेल्या राज्यात जास्त निधीचे वाटप

केंद्र सरकारचा दुपट्टीपणा, सत्ता असलेल्या राज्यात जास्त निधीचे वाटप

राज्यात नाही तर देशात कोरोना संसर्ग आजाराने हाहाकार माजवला आहे. आज इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण काही अंशतः जास्त प्रमाणात आहे. मात्र याला राज्याची भौगोलिक परिस्थिती सुद्धा कारणीभूत आहे. आता केंद्र सरकारच्या आदेशानुसार १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार अर्थ मंत्रालयाने राज्यांचा हिस्सा निश्चित करून एकूण ४६०३८ कोटींची रक्कम जाहीर केली आहे.

उत्तर प्रदेशला सर्वाधिक ८२५५ कोटी रुपये मिळाले आहेत, तर सिक्कीमला सर्वात कमी १७८ कोटी रुपये मिळाले आहेत. पश्चिम बंगालला ३४६१ कोटी आणि पंजाबला ८२३ कोटी मिळाले आहेत. बिहारला ४६३१, महाराष्ट्राला २८२४, राजस्थानला २७५२ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र आज उत्तरप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तरीही आज महाराष्ट्राला डावलण्याचा प्रकार केंद्राने केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here