कोरोना विरोधाच्या लढाईसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – अब्दुल सत्तार

कोरोना विरोधाच्या लढाईसाठी-For the battle against Corona

कोरोना विरोधाच्या लढाईसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – अब्दुल सत्तार

सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्व लोकप्रतिनिधी आप-आपल्या मतदारसंघात राहून कोरोनाच्या लढाईत मदत करत आहेत. त्यातच कोरोनाशी लढण्यासाठी शासन स्तरावरुन स्थानिक यंत्रणांना सर्व प्रकारची मदत होत आहे. जिल्ह्यात एक हजार कोरोना विषाणू चाचणी संचाची उपलब्धता आहे. कमतरता भासल्यास त्याची पूर्तता करण्यासाठी आणखी १५०० संचाचे नियोजन झाले आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या मागण्यांची तातडीने पूर्तता करण्यात येत आहे, अशी माहिती महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘कोरोना बाधितांचा मृतदेह नेण्यासाठी सर्व सोयीयुक्त एक रुग्णवाहिका हिरे महाविद्यालयाला देण्यात येईल. कोरोना रुग्णांना सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही उपचार देण्याचा प्रस्ताव तयार असून लवकरच त्याचा निर्णय येईल,’ असं सत्तार म्हणाले. रेशन वाटपासंदर्भात असलेल्या तक्रारींचे निवारण करण्याच्या पुरवठा विभागाला सूचना केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here