पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

पवित्र रमजान महिन्यानिमित्त मु-On the occasion of holy month of Ramadan

पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विरुद्धच्या लढ्यात जात धर्म विसरून आपण एकत्र येऊन मुकाबला करीत आहोत. एरव्ही आपण हा सण एकमेकांना भेटून आणि उत्सवासारखा सार्वजनिक ठिकाणी साजरा करतो मात्र आपण यंदा रमजानच्या महिन्यात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे आणि घरगुती स्वरूपातच धार्मिक कार्यक्रम करावेत असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

‘मुस्लिम धर्मगुरुंनीही या कोरोना संकटात शासनाला चांगली साथ दिली आहे . मी त्यांनाही आवाहन करतो की कुठेही धार्मिक आणि सार्वजनिक स्थळी एकत्र न येता रमजानचा हा पवित्र सण साजरा करू यात आणि आपल्या तसेच समाजाच्या आरोग्याला प्राधान्य देऊ,असेही मुख्यमंत्री म्हणतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here