पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा

पंतप्रधान-नरेंद्र-मोदींच-Prime Minister-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत आहे. या कॉन्फरन्सद्वारे राज्यातील कोरोना रुग्णांच्या

परिस्थितीची माहिती पंतप्रधान मोदी राज्यातील मुख्यमंत्र्याकडून घेणार आहे. येत्या 3 एप्रिलला देशातील लॉकडाऊन संपणार आहे. त्यानंतर पुढील रणनिती आखण्यासाठी आज सर्व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. या बैठकीला सकाळीच सुरुवात झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे या बैठकीत सहभागी झाले आहेत.

या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या राज्यातील कोरोनाची स्थिती काय आहे, राज्यात कोरोनाचे किती रुग्ण आहे, कोरोनामुळे किती मृत्यू झाले याबाबतची माहिती दिली आहे. त्यानंतर इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राज्यतील कोरोनाच्या स्थितीची माहिती मोदींना दिली. आता या बैठकीत लॉकडाऊन वाढण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली जात आहे. दरम्यान या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वपूर्ण असणार आहे.

आता पर्यंत दोन वेळा मोदींनी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे या चर्चेनंतरच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. आता यापुढे लॉकडाऊन वाढणार की त्याला स्थगिती देण्यात येणार हे लवकरच समोर येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here