अभिनेता इरफान खान याचं निधन; बॉलीवूड शोकसागरात

अभिनेता-इरफान-खान-याचं-नि-Actor-Irrfan-Khan

बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता इरफान खान यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. बॉलिवूड अभिनेता इरफान खानची तब्येत अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्याला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. देशभरातील इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करतहोते मात्र अखेर इरफानची झुंज अपयशी ठरली आहे .

२०१८ मध्ये अभिनेता इरफान खान याला ट्युमर झाल्याचे निष्पन्न झाले होते. इरफानला न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर हा आजार होता. या ट्युमरची माहिती त्याने स्वतः हुन ट्विटर द्वारे दिली होती. त्यानंतर उपचार घेत असताना त्याने अनेक चित्रपटांत काम केले होते.

काही महिन्यापूर्वी त्यांचा इंग्लिश मिडीयम हा चित्रपट देखील आला होता. दरम्यान, प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काल मुंबई मधील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले गेले आहे. दरम्यान,याच आठवड्यात त्यांना मातृशोक देखील झाला होता. इरफान खान यांच्या मातोश्रीने राजस्थान मध्ये अखेरचा श्वास घेतला होता. लॉकडाऊन असल्याने इरफान खान देखील अंतिम दर्शनासाठी जाऊ शकला नाही

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here