स्थलांतरित मजुरांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी केंद्राने जाहिर केल्या सूचना

स्थलांतरित-मजुरांना-आपल्-Migrant-workers-yours

स्थलांतरित मजुरांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी केंद्राने जाहिर केल्या सूचना

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमूळे पंतप्रधान मोदी यांनी देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र अचानक जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कामानिमित्त इतर राज्यात मोलमजुरी करून जगणाऱ्या कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती. या सर्व कामगार आणि मोलमजुरी करणाऱ्या कारागिरांना आपल्या मूळ गावी पाठवण्यासाठी राज्य सरकार वेळोवेळी केंद्र सरकारशी पत्राद्वारे या विषयी चर्चा करत होती.

अखेर केंद्र सरकारने राज्यातील स्थलांतरित मजुरांची एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. याकरता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत

1) परप्रांतीय मजूर त्याच बरोबर विद्यार्थ्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवासाबाबत काही अटीसह प्रवासाची       परवानगी देण्यात येईल.
2) ज्या दोन राज्यात प्रवास करायचा आहे त्या दोन्ही राज्यांची परवानगी आवश्यक असेल.
3)बसनेच वाहतूक प्रवास करण्याची अनुमती देण्यात आली आहे.
4) प्रवास करणाऱ्या सर्वांची चाचणी करण्यात येईल. प्रवास करण्याआधी आणि निश्चित ठिकाणी पोहचल्यानंतर दोन्ही ठिकाणी कोरोनाची चाचणी करण्यात येईल.
5) अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना 14 दिवस क्वारंटाईन
करण्यात येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here