महाराष्ट्रात नवे ७७१ करोना रुग्ण, ३५ मृत्यू, संख्या १४ हजार ५०० च्याही वर

संस्थात्मक क्वारंटाईनसाठी आक्र-Acre for Institutional Quarantine

महाराष्ट्रात नवे ७७१ करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आज ३५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत २६४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज राज्यात ३५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये मुंबईतील १८, पुण्यातील ७, अकोल्यातील ५, सोलापूरमध्ये १, औरंगाबादमध्ये १, ठाणे शहरात १ आणि नांदेड शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील एका नागरिकाचा मृत्यूही मुंबईत झाला आहे अशीही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

आज ज्या ३५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी २२ रुग्ण पुरुष तर १३ महिला होत्या. तसेच या ३५ मृत्यूंमध्ये ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे १३ रुग्ण होते. तर १९ रुग्ण हे ४० ते ५९ वर्षे या वयोगटातले होते. तर ३ जण हे ४० वर्षे वयापेक्षा कमी वयाचे होते. दोन मृत रुग्णांची माहिती मिळू शकलेली नाही. उर्वरित ३३ पैकी २३ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी गंभीर स्वरुपाचे आजार होते. करोनाची लागण होऊन राज्यभरात आत्तापर्यंत ५८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या १ लाख ७६ हजार ३२३ नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार ३४९ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर १४ हजार ५४१ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत २६४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात १ लाख ९८ हजार ४२ जण होम क्वारंटाइन आहेत. तर १३ हजार ६ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. अशीही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here